पाकिस्तानने भारताविरुद्ध 1965 आणि 1971 मध्ये युद्धे लढली होती, तो शीतयुद्धाचा काळ होता.शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य आघाडीचा भाग होता.
शीतयुद्धादरम्यानच 1979 मध्ये सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तानवर हल्ला केला होता.सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानमध्ये कम्युनिस्ट सरकार हवं होतं आणि इस्लामी कट्टरवाद्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं होतं.दुसऱ्या बाजूला, ज्या देशांत कम्युनिस्ट सरकारं होती, त्या देशांना कमकुवत करण्याची अमेरिकेची मोहीम होती.अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनचा पराभव करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानची मदत घेत होता. त्याच्या बदल्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळत होती.अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली जवळीक त्यांच्या धोरणात्मक गरजेमुळे होती आणि ही गरज कायमस्वरूपी नव्हती.
अफगाणिस्तानात पाकिस्तान आणि अमेरिकेनं ज्या कट्टरवाद्यांना पुढं आणलं, तेच नंतर त्यांच्यासाठीच आव्हान बनलं आणि हे आव्हान आजही कायम आहे.1962 मध्ये चीननं भारतावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला, पण त्यांचा अंदाज चुकीचा ठरला.
पाकिस्तानचा अंदाज चुकीचा ठरला :-
तेव्हा पाकिस्तानला वाटलं होतं की, चीनबरोबर झालेल्या युद्धामुळे भारताचं मनोबल खूपच खचलं असेल, अशा परिस्थितीत त्यांचा पराभव होऊ शकतो. पण पाकिस्तानला आपला उद्देश साध्य करता आला नाही.1965 च्या युद्धात अमेरिकेनं पाकिस्तानला कोणतीही लष्करी मदत दिली नव्हती. भारतालाही त्यांचा पाठिंबा नव्हता.1971 च्या युद्धात अमेरिकेनं पाकिस्तानला मदत केली होती. अगदी अमेरिकन युद्धनौका यूएसएस एंटरप्राइज ही व्हिएतनाममधून बंगालच्या उपसागरात पोहोचली होती.गरज पडल्यास अमेरिका पाकिस्तानला मदत करू शकते, असा संदेश सोव्हिएत युनियनला देण्यासाठी अमेरिकेनं हे केल्याचे बोलले जाते.अमेरिकेनं थेट हस्तक्षेपासाठी कोणतेही आदेश दिले नव्हते. परंतु राजनैतिक आणि मानसिक पातळीवर ती पाकिस्तानच्या बाजूनं उभी होती.
1971 च्या ऑगस्ट महिन्यात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘इंडिया-सोव्हिएत ट्रीटी ऑफ पीस, फ्रेंडशिप अँड को-ऑपरेशन’ या करारावर स्वाक्षरी केली होती.या कराराअंतर्गत सोव्हिएत युनियननं भारताला युद्धाच्या परिस्थितीत ते राजनयिक तसेच शस्त्रास्त्रांसह समर्थन देतील, असं आश्वस्त केलं होतं.1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 13 दिवसांचं युद्ध झालं होतं. पूर्व पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटामुळे हे युद्ध झालं.या युद्धानंतरच पूर्व पाकिस्तान बांगलादेश म्हणून स्वतंत्र झाला होता. म्हणजे पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात भारत यशस्वी झाला होता.पाकिस्तान हा पाश्चिमात्य देशांचा मित्र होता, तरीही भारताविरुद्धच्या प्रत्येक युद्धात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.भारताच्या विरोधात पाकिस्तानला पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा तर होताच पण आखाती देशांचे इस्लामी देशही त्यांच्यासोबत होते.शीतयुद्ध संपल्यानंतर जवळपास नऊ वर्षांनी 1999 मध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा कारगिलवर हल्ला केला आणि यावेळीही पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती.
भारत ही जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
या तीन युद्धांनंतर जग पूर्णपणे बदललं आहे. सोव्हिएत युनियन अनेक भागांमध्ये विभागलं गेलं आणि आता फक्त रशिया उरला आहे.परंतु, जग दोन ध्रुवीय असण्याऐवजी एक ध्रुवीय बनला आहे आणि आता चीन दुसऱ्या ध्रुवासाठी मजबूत दावा करत आहे.दुसरीकडं भारत ही जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.बदलत्या जगात भारताचंही स्वतःचं स्थान आहे. पण पाकिस्तान अजूनही आर्थिक आघाड्यांवर सौदी अरेबिया, चीन आणि जागतिक संस्थांवर अवलंबून आहे.अमेरिकेला आता अफगाणिस्तानमध्ये कोणाचं सरकार आहे, याची विशेष काळजी नाही. अशा परिस्थितीत त्यांना पाकिस्तानची देखील पूर्वीप्रमाणं गरज नाही.आता दोन देशांमधील संबंध किती खोल आणि परस्पर आहेत, हे आता दोन्ही देश एकमेकांच्या अर्थव्यवस्थेत किती योगदान देत आहेत यावर देखील अवलंबून आहे.
रशियाबाबत पाश्चिमात्य देशांच्या बोलण्याकडे भारताने दुर्लक्ष केले होते. तरीही पाश्चिमात्य देशांनी भारताविरुद्ध सक्तीचे धोरण अवलंबले नव्हते.अमेरिका आणि चीनसह भारताचा द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सच्या पलीकडे गेला आहे.तर आखातातील महत्त्वाचा देश यूएई सोबतही भारताचा द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्स पार केला आहे.तसेच, सौदी अरेबिया सोबत भारताचा वार्षिक द्विपक्षीय व्यापार जवळपास 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया सोबत भारताचा द्विपक्षीय व्यापार 65 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे.भारताचे तीन सर्वात मोठे व्यापारी भागीदार आणि सौदी अरेबिया, पाकिस्तानचे मित्र आहेत किंवा मित्र होते.पाकिस्तानसोबत या देशांचा द्विपक्षीय व्यापार काही विशेष नाही.
तुर्की कोणासोबत आहे?
कोणताही देश पाकिस्तानसाठी भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेकडं दुर्लक्ष करु इच्छित नाही. जेव्हा भारतानं जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला तेव्हा सौदी अरेबियानं त्याला विरोध केला नाही.सौदी अरेबियाचे भारतासोबत व्यापारी हितसंबंध जोडलेले आहेत, असं पाकिस्तानातील विश्लेषकांचं म्हणणं होतं.इतकंच नव्हे तर हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान मोदी यांना सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान मोठा भाऊ म्हणतात.शीतयुद्धानंतर बदललेल्या जगात भारताचं महत्त्व वाढलं आहे, तर पाकिस्तानला मात्र आपलं जुनं महत्त्व टिकवून ठेवण्यात अपयशं आलं आहे.या वर्षी जानेवारीत ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा व्यवहाराधारित संबंधांना आणखी बळ मिळालं.म्हणजेच, तुम्ही अमेरिकेकडून किती खरेदी करता आणि त्यांना किती विकता, हेच अधिक महत्त्वाचं ठरतं.शीतयुद्धात कोण सोबत होतं आणि कोण विरोधात होतं, याला फारसा अर्थ उरत नाही.
कोणताही देश पाकिस्तानसाठी भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेकडं दुर्लक्ष करु इच्छित नाही. जेव्हा भारतानं जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला तेव्हा सौदी अरेबियानं त्याला विरोध केला नाही.
सौदी अरेबियाचे भारतासोबत व्यापारी हितसंबंध जोडलेले आहेत, असं पाकिस्तानातील विश्लेषकांचं म्हणणं होतं.
इतकंच नव्हे तर हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान मोदी यांना सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान मोठा भाऊ म्हणतात.
शीतयुद्धानंतर बदललेल्या जगात भारताचं महत्त्व वाढलं आहे, तर पाकिस्तानला मात्र आपलं जुनं महत्त्व टिकवून ठेवण्यात अपयशं आलं आहे.
या वर्षी जानेवारीत ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा व्यवहाराधारित संबंधांना आणखी बळ मिळालं.
म्हणजेच, तुम्ही अमेरिकेकडून किती खरेदी करता आणि त्यांना किती विकता, हेच अधिक महत्त्वाचं ठरतं.
शीतयुद्धात कोण सोबत होतं आणि कोण विरोधात होतं, याला फारसा अर्थ उरत नाही.
सौदी आणि इराणचे मंत्री भारत दौऱ्यावरअर्दोआन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची फोनवर चर्चा झाली आहे.त्याबद्दल अर्दोआन म्हणाले, ”पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली आहे. मला वाटतं की, जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे.””काही लोक या परिस्थितीत तेल ओतण्याचं काम करत आहेत, पण तुर्कीला तणाव कमी करायचा आहे आणि संवाद सुरू व्हावा असं वाटतं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू व्हावा, अशी आमची इच्छा आहे.”अर्दोआन यांनी जे म्हटलं आहे, ते पाकिस्तानच्या धोरणाचं समर्थन आहे.पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी, अशीही पाकिस्तानचीही मागणी आहे.याशिवाय अर्दोआन यांनी केवळ पाकिस्तानमध्ये मरण पावलेल्यांनाच श्रद्धांजली वाहिली असून तेथील लोकांचे बंधूसमान असं वर्णन केलं आहे.अर्दोआन यांच्या हाती तुर्कीची कमान आल्यापासून पाकिस्तानसोबत त्यांचे लष्करी पातळीवर संबंध वाढले आहेत आणि भारतासोबतच्या अंतरांमध्ये देखील वाढ झाली आहे.
सौदी आणि इराणचे मंत्री भारत दौऱ्यावर
अर्दोआन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची फोनवर चर्चा झाली आहे.
त्याबद्दल अर्दोआन म्हणाले, ”पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली आहे. मला वाटतं की, जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे.”
“काही लोक या परिस्थितीत तेल ओतण्याचं काम करत आहेत, पण तुर्कीला तणाव कमी करायचा आहे आणि संवाद सुरू व्हावा असं वाटतं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू व्हावा, अशी आमची इच्छा आहे.”
अर्दोआन यांनी जे म्हटलं आहे, ते पाकिस्तानच्या धोरणाचं समर्थन आहे.
पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी, अशीही पाकिस्तानचीही मागणी आहे.
याशिवाय अर्दोआन यांनी केवळ पाकिस्तानमध्ये मरण पावलेल्यांनाच श्रद्धांजली वाहिली असून तेथील लोकांचे बंधूसमान असं वर्णन केलं आहे.
अर्दोआन यांच्या हाती तुर्कीची कमान आल्यापासून पाकिस्तानसोबत त्यांचे लष्करी पातळीवर संबंध वाढले आहेत आणि भारतासोबतच्या अंतरांमध्ये देखील वाढ झाली आहे.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








