भारताने पाकचा डाव उधळून लावत पाकच्या रावळपिंडी, चकलाल, शेरकोट, रहीमयार एअरबेसवर स्फोट घडवून आणत ते पूर्णतः उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूरखान एअरबेस हा पाक वायुसेनेचा सर्वात प्रमुख एअरबेस होता.
बेस उद्ध्वस्त झाल्याची पुष्टी पाकनेही केलीये. हल्ल्यावेळी इथं मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानं असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारताकडून कऱण्यात आलेल्या स्फोटात रडार यंत्रणाही नेस्तनाबूत झाल्याचं सांगितलं जातंय. पाक सैन्याचं मुख्यालय देखील एअरबेसच्या बाजूला आहे.
तर पाकिस्तानचा पंजाब प्रांतातील रहिम यार खान एअर बेस या हल्ल्यात नष्ट झाला आहे. याच बेसमधून पाक सैन्य भारताच्या हद्दीत ड्रोन पाठवून हल्ले करत होतं. मात्र भारताच्या हल्यात येथील सगळे ड्रोन नष्ट झाल्याचा अंदाज आहे. भारताच्या राजस्थान आणि गुजरात सीमेजवळ असल्याचे हा एअरबेस पाकसाठी महत्त्वाचा होता.
चकलाला येथील मुरीद एअरबेसचंही हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे. हा एअरबेस देखील रावळपिडींपासून काही अंतरावर होता. पाकिस्तान वायुदलाच्या युद्ध सामुग्रीसाठी हा तळ महत्त्वाचा होता. आणखी नेमके कोणते-कोणते एअरबेस पाकमध्ये होते? जे भारतानं उडवलेत
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








