best news portal development company in india

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी, बड्या नेत्याचा उपनेतेपदाचा राजीनामा!

SHARE:

शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागलेले असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. कोकणातील ज्येष्ठ शिवसेना नेते, माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुसऱ्या शिवसेनेत ते गुरुवारी प्रवेश करतील, असे सांगण्यात येते.लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार प्रतिसादाने अपेक्षा वाढलेल्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार पिछेहाट झाल्याने अनेक नेत्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीची चिंता लागून राहिली आहे. काही नेत्यांमध्येही पक्षांतराविषयीची चलबिचल मनात सुरू असताना इकडे कोकणातील शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना भवनात राजीनामा पाठवला, ठाण्यात पक्षप्रवेश होणारशिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा शिवसेना भवन कार्यालयात दिला. उद्या राजन साळवी ठाण्यात शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मागील अनेक दिवसांपासून साळवी यांची शिवसेना सोडण्याची चर्चा होती. ईडीची वक्रदृष्टी पडल्यानंतर काही काळ त्यांनी संघर्ष करण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु पक्षनेतृत्वाची म्हणावी अशी साथ मिळत नसल्याची भावना त्यांच्या मनात होती. शिवाय माजी खासदार विनायक राऊत यांच्याशीही त्यांचे अजिबातच जमत नव्हते. सगळी कारणे जुळून आल्यावर अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत राजन साळवी?

तीन वेळा आमदार राहिलेल्या राजन साळवी यांनी कोकणात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतही राजन साळवी यांनी काम केले. शिवसेनेकडून तीन वेळा त्यांनी राजापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. परंतु महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपची सत्ता येताच साळवी यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली. त्यानंतरच्या काही काळ त्यांनी संघर्षाची भूमिका स्वीकारली. पण विधानसभेत पराभूत झाल्यानंतर पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्याची भावना मनात ठेवून पक्ष सोडण्याविषयीची भावना त्यांची झाली होती. अखेर त्यांनी बुधवारी निर्णय घेऊन शिवसेना शिंदे गटात जाण्याचा मार्ग मोकळा करून घेतला.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india