best news portal development company in india

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदं?

SHARE:

मुंबई : महायुतीला राज्यात दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागलं आहे. देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीतल्या बैठकीआधी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा करण्यात आली.

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून भाजपला 23 ते 26, तर शिवसेनेला 9 ते 11, राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

उपस्थित आमदारांकडून अडीच वर्षाच्या एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं. पहिल्या दिवसापासून मतदारसंघाशी मतदारांशी प्रामाणिक रहा, मतदारसंघात काम करा, लोकांच्या मताचा सन्मान करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आला. मुंबईत आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india