
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात पुन्हा महायुती येणार की महाविकास आघाडीला सत्ता मिळणार हे उद्या स्पष्ट होईल. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल देण्यात आलाय. पण राज्यात जर कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रपती राजवटीची वेळही येऊ शकते. तसंच बहुमत मिळालं तरीही २०१९ ची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात पुन्हा महायुती येणार की महाविकास आघाडीला सत्ता मिळणार हे उद्या स्पष्ट होईल. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल देण्यात आलाय. पण राज्यात जर कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रपती राजवटीची वेळही येऊ शकते. तसंच बहुमत मिळालं तरीही २०१९ ची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.
जाहिरातएक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. पण कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर राज्यपाल सत्तास्थापनेसाठी मोठ्या पक्षाला आमंत्रित करतील. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने सहकारी पक्षांसह अपक्षांसोबतही चर्चा सुरू केल्या आहेत. निकालाआधी यामुळे घडामोडींना वेग आला आहे.सरकार कधीपर्यंत स्थापन करता येणार?सध्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे. त्याआधी सरकार स्थापन करावं लागेल.
मात्र संवैधानिकदृष्ट्या या मुदतीआधी विधानसभा गठित होणं आवश्यक असतं. त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा करता येतो.सरकार स्थापनेचा दावा हा विधानसभा सदस्यांच्या पाठिंबा देणाऱ्या सहीच्या पत्रासह करावा लागतो. यासाठी १४५ हा बहुमताचा आकडा असेल. त्यानंतर नेत्याला राज्यपाल आमंत्रित करतील.
राज्यपाल या दरम्यान, सदस्यांच्या पाठिंब्याची खातरजमा करतील आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पहिलं अधिवेशन होईल. यात आमदारांचा शपथविधी होतो. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभेचा कार्यकाळ सुरू होतो.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








