
जत : कर्नाटक हद्दीपासून अवघ्या चार किलोमीटरवर कोंत्येवबोबलाद ते गुलगुंजनाळ रस्त्यालगत एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 20 लाख रकमेसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व जुगार खेळत असलेल्या 45 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई थेट जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशानुसार रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण व जिल्हा पोलिस कार्यालयातील सायबर विभागाने केली.
जुगार अड्डा चालक-मालक मेहबूब गोल्डन, मुन्ना बागवान, सादिक इनामदार (रा. विजयपूर, कर्नाटक), अनेक वर्षांपासून जुगार अड्ड्याचा मास्टरमाईंड असणारा संतोष गोविंद बजंत्री (वय 32, रा. बेळोंडगी), संदीप चौगुले (रा. जयसिंगपूर) यांच्यासह विजयपूर (कर्नाटक) येथील एकवीसजण, सोलापूर येथील तिघेजण, जत तालुक्यातील बेळोंडगी येथील एक, उमदी येथील एक व कर्नाटकातील इतर ठिकाणचे चौदाजण अशा एकूण 45 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईत 19 लाख 36 हजार 750 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. त्याचबरोबर 10 लाख 23 हजार किमतीचे 42 मोबाईल, 18 लाख किमतीच्या तीन कार, सव्वा लाख किमतीच्या दोन मोटरसायकली असा एकूण 48 लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत तब्बल 45 जणांवर महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण व सायबर विभागाच्यावतीने कोंत्येवबोबलाद येथील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. दरम्यान, सोमवारी चेकपोस्ट व सीमावर्ती भागात जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे यांनी पाहणी केली. रविवारच्या कारवाईला अनुसरून अवघ्या चारच दिवसांत जिल्हा पोलिस प्रमुखांना चेकपोस्टला भेट द्यावी लागली.
या संशयितांवर झाली कारवाई…नबी रसुल सुलेमान (वय 35), चन्नाप्पा मल्लिकार्जुन मोकाशे (27), महेबूब चांदसाब बोरगी (45), आश्रम दादापीर जमादार (34), आनंद नीलेश बिरादार (29), जावेद महेबूब मुल्ला (32), संजू शांतगोडा बिराजदार (43), शकील अल्लाबक्ष हुकली (51), सुभाष कल्लाप्पा गुडीमनी (39), महाराज मल्हारी उपाडे (38), रवि बसवंत शेगुंशी (50), सुनील महादेव राठोड (27), मोहम्मद हुसेन फारूकी (28), मोहम्मद फय्याज शहाबुद्दीन शेख (39), अल्ताफ जब्बार मुंडेवाडी (42), बसवराज शंकरप्पा केमशेट्टी (37), फय्याज अहमद इनामदार (50), अप्पू बिराप्पा इंचगेरी (46), इसाक मगबुल हुबली (42), अमजद खान पठाण (36), मुजाहिद इब्राहिमसाब जमादार (49), मलीकसाब मोदीनसाब गुगरे (33, सर्व रा. विजयपूर, कर्नाटक), भीमाप्पा बसाप्पा सानातंगी (38), इमामसाब अल्लाबक्ष छपरबंद (30, दोघेही रा. आगसबाळ, कर्नाटक), सोमनाथ सिद्रामप्पा नाटीकर (30), विनोद रामलाल अग्रवाल (49, दोघेही रा. बसवंत बागेवाडी, कर्नाटक), इलाई माहमुद शेख (47), सलीम बाबुलाल मुजावर (53, दोघेही रा. सोलापूर), संतोष गोविंद बजत्री (32, रा. बेकुंडगी, ता. जत), कादिर राजासाब बागवान (45, रा. ताळीपूर), रवि शांताप्पा शिंदे (32, रा. चडचण, कर्नाटक), निजाम अब्दूल समदखान (46, रा. वईजिंदगी, सोलापूर), जगदीश भीमराया कुंभार (39, रा. इंडी, कर्नाटक), आनंद शिवानंद बेकुंडगी (37, रा. कन्नूर, कर्नाटक), योगेश मल्लिकार्जुन वागदरे (28, रा. उमदी, ता. जत), श्रीशैल इरय्या घेरडी (66, रा. सालोटी, कर्नाटक), शिवशंकर विरान्ना गब्बूर (43, रा. मनगुळे, कर्नाटक), अबु तालीब बागवान (28, रा. दवाहिप्परगी, कर्नाटक), सतीश मुरगेप्पा बेकुंडगी, (32, रा. कन्नूर, कर्नाटक), परसाप्पा तिमान्ना मेरी (30, रा. जयवाडी, कर्नाटक), प्रकाश शरणाप्पा पुजारी (45, रा. बुदयाळ, कर्नाटक)
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








