
मुंबई : हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधासनभा निवड़णुकीचं बिगुल वाजणार आहे. राज्यात हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील निवडणूक एक किंवा दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोग एकाच टप्प्यात निवडणूक घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
झारखंडमध्ये दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. सुरक्षेची कोणतीही कमी नाही, तसंच झारखंडमधली परिस्थितीही सामान्य आहे, त्यामुळे झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी दिली आहे. दिवाळी आणि छट लक्षात घेऊनच निवडणूक आयोग तारखा निश्चित करेल, असंही निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
26 नोव्हेंबर आधी निकाल?निवडणूक आयोगाने याआधीच विधासनभा निवडणुकीबद्दल स्पष्ट केलं होंत की, २६ नोव्हेंबर आधी निकाल लागेल. आचारसंहिता कालावधी ३० दिवसांची असण्याची शक्यता आहे. राज्याची विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. त्याआधी निवडणूक प्रक्रिया निकालासह पूर्ण करावी लागणार आहे.सत्ताधारी,विरोधकांची जागावाटपाची चर्चा सुरूचसत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये बहुसंख्या जागांवर एकमत झाले आहे. काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या दिल्लीत बैठका पार पडणार आहेत. जागा वाटपावर अंतिम निर्णय आणि उमेदवारांची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








