best news portal development company in india

बेडग येथे श्री संत भगवान बाबा नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…..

SHARE:

बेडग येथील श्री भगवान बाबा नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (ता.23) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे(पंच )यांनी पतसंस्था मागिल आर्थिक वर्षात नफ्यात आली असल्याचे सांगुन ठेवीदारांचा विश्वास संपादन झाल्याचे सांगितले.बेडग येथील छोट्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करणारी श्री भगवान बाबा नागरी सहकारी पतसंस्था बेडग ची 23 वी सर्वसाधारण सभा रविवार (ता.23) सकाळी ११:०० वाजता पतसंस्थेच्या कार्यालयासमोर असलेले गणपती मंदिर मध्ये संपन्न झाले.यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे (पंच )यांनी पतसंस्था सरलेल्या आर्थिक वर्षात नफ्यात आली असल्याचे सांगितले. तसेच पतसंस्थेला यावर्षी ऑडिट वर्ग “ब” मिळाल्याचे सांगितले. पतसंस्था सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करुण चालविण्यात येत आहे. पतसंस्थेवर ठेवीदारांचा विश्वास वृध्दींगत होत आहे.मागच्या वर्षात ठेवीमध्ये पंचवीस टक्के वाढ झाली आहे. बहुतांश कर्जदार नियमीत फेड करीत असल्यामुळे पतसंस्थेच्या नफ्यात दरवर्षी वाढ होत आहे.

पतसंस्थेच्या आर्थिक पत्रकाचे वाचन श्री राजेंद्र नागरगोजे (सर ) अध्यक्ष शिक्षण परिषद पुणे विभाग यांनी केले. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजय गोसावी , संचालक पंडित वनवे (साहेब ), अशोक (भाऊ )ओमासे , तानाजी ओमासे , परशुराम नागरगोजे , डे.सरपंच संभाजी नागरगोजे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मा.बाळासाहेब ओमासे , बाबासाहेब खाडे , जयवंत नागरगोजे , वसंत पाटील , हजिबा करे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश ओमासे , सचिन नागरगोजे , सुरेश नागरगोजे , दादासाहेब चव्हाण , सुभाष ओमासे सर यांनी परिश्रम घेतले.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india