
चोरीच्या घटना घडत असताना संध्याकाळच्या वेळेस केला जातोय वीजपुरवठा खंडित.जर अनुचित प्रकार घडल्यास याला प्रशासन जबाबदार आहे काय.? असा सवाल बेडग ग्रा. स गौतम नागरगोजे यांनी केला असता कार्यकारी अधिकारी कवठेमहांकाळ यांची उडवा उडवीची उत्तरे..
बेडग मधील महावितरण कार्यालयास वारंवार.. सांगूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.महावितरण चे मा.मुख्य अभियंता महावितरण विभाग, मिरज यांना बेडग मधील ग्रामस्थांनी भेट देऊन घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर मा.मुख्य अभियंत्यांनी लोड शेडिंग चे कारण देऊन टाकले..जर लोड शेडिंग चे कारण देऊन वीजपुरवठा खंडित केला व कोणता अनुचित प्रकार घडल्यास याला प्रशासन जबाबदार असणार आहे का असा थेट जनतेतून असा सवाल करण्यात येत आहे.
बेडग ता. मिरज येथे ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडत असताना दररोज सायंकाळी / रात्री वीजपुरवठा खंडित केला जातोय.. यामुळे गावातील व वाड्या वस्तीवरील लोक भयभीत झालेले आहेत…. बेडग गावातील बरेचसे लोक वाड्या वस्तीवर वास्तव्यास आहेत. जर महावितरण ने रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित केल्यास व त्यामुळे कोणता अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असणार आहे का ? असा सवाल जनतेतून करण्यात येत आहे.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








