best news portal development company in india

जिल्हा परिषद पी. एम. श्री.शाळा विद्यानगर, (सानपवस्ती) बेडग येथे मासिक सभेदरम्यान जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची अचानक भेट

SHARE:


साधला थेट पालकांशी सुसंवाद
जिल्हा परिषद पी एम श्री शाळा विद्यानगर , बेडग शाळेमध्ये पालकसभेचे आयोजन केले होते या मध्ये शाळेमधील आवश्यक भौतिक सुविधा यासाठी १४ सप्टेंबर रोजी अकरा वाजता शिक्षक पालक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती या पालकसभेत चर्चा चालू असताना अचानक शिक्षणाधिकारी . श्री . मोहन गायकवाड यांनी शाळेला अचानक भेट दिली .


या शिक्षक पालक सहविचार सभेमध्ये मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी पालकांच्या आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, पाचवी शिष्यवृत्तीसह सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आणि त्यासाठी लागणारे साहित्य, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि नियमित उपस्थिती, क्रीडा , खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा यासाठी लागणारा वेळ आणि खर्च, विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची तयारी , शालेय शिस्त आणि चांगल्या सवयी या ठळक मुद्यांवर विचार विनिमय झाले.

यानंतर शिक्षणाधिकारी पालकांना मार्गदर्शनपर उद्बोधन केले.ग्रामीण भागात एका वस्तीवर २७० पटसंख्या असणारी शाळा आणि १०६ पालकांची उपस्थिती पाहून साहेबांना शिक्षक व पालक यांच्या सुसंवादाचा अंदाज आला.किशोरवयीन वयोगट आणि पालकांची जबाबदारी , सुरक्षितता , शाळेच्या विकासासाठी पालकांच्या सहभागाचे महत्त्व याविषयी गायकवाड साहेबांनी पालकांना मार्गदर्शन केले आणि शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले.शालेय विविध उपक्रम याविषयी पालकांशी सुसंवाद साधला .

शालेय भौतिक परिसर , किचन गार्डन, परसबाग, यशस्वी असा गांडूळ खत प्रकल्प आणि त्यातील गांडूळ प्रजाती,विविध वृक्षांची निगा , शाळेचे सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, धान्याची खोली , स्वयपाकगृह , स्वच्छ आणि सर्व सोयी सुविधा असणारी स्वच्छता गृहे , सी.सी.टी.व्ही, बाला पेंटींग , लॉनसह विविध फूलझाडांची लागवड , ‘चला सावली पेरुया’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेली नर्सरी , विद्यार्थी गुणवत्ताआणि पालकांची शाळेशी असलेली नाळ पाहून साहेबांनी शाळेच्या प्रगती विषयी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब कोरे , सर्व शिक्षक स्टाफ , शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,सखी सावित्री समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सर्व सदस्य आणि पालक बंधू भगिनी उपस्थित तसेच या वेळी बेडग केंद्राचे केंद्रप्रमुख मा . विजय नागरगोजे व नांद्रे केंद्राचे केंद्रप्रमुख मा .श्री . उल्हास सानप उपस्थित तसेच ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील उपस्थित होते.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india