best news portal development company in india

सांगलीत भरदुपारी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून, आठ ते दहा जणांचा हल्ला, संजयनगर पोलिसांसह गुन्हे शाखेची तपासासाठी धाव, संशयितांचा शोध सुरु

SHARE:

सांगलीत भरदुपारी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून, आठ ते दहा जणांचा हल्ला, संजयनगर पोलिसांसह गुन्हे शाखेची तपासासाठी धाव,

संशयितांचा शोध सुरुदि.12/05/25 सांगलीतील सह्याद्री नगर परिसरात आज भरदुपारी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आला. मुबारक शाह(वय30,रा.अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. दुपारी चारच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर चाकूने वार करत क्रूरपणे हत्या केली.

घटनास्थळी संजय नगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तत्काळ दाखल झाले असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. मुबारक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरु आहे.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india