best news portal development company in india

ऑनलाईन गेमच्या नादात वसईत मुलानं केली आईची हत्या, बापानं दिली साथ! असं समजलं सत्य

SHARE:

ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने एका तरुणाने त्याच्या सावत्र आईची निर्घृण हत्या केली,ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने एका तरुणाने त्याच्या सावत्र आईची निर्घृण हत्या केली . या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी त्यानं वडिसांसोबत मृतहेह दफन केले होते. वसईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे

काय आहे प्रकरण?

वसई पश्चिमेतील बाभोळा भागातील पेरियार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 61 वर्षांच्या आर्शिया खुसरो यांची त्यांच्या सावत्र मुलगा इम्रान खुसरो (३२) याने हत्या केली. इम्रानला व्हीआरपीओ नावाच्या ऑनलाइन गेमचं व्यसन होते. या गेमसाठी त्याला 1 लाख 80 हजार रुपयांची गरज होती. त्यासाठी त्याने सावत्र आईकडे पैसे मागितले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या इम्रानने त्यांच्यावर लाथाबुक्क्यांचा मारा केला आणि डोकं आपटून त्यांची हत्या केली.

वडिलांनी दिली साथ

आरोपी इम्रानने सावत्र आईची हत्या केल्याची माहिती त्याचे वडिल आमिर खुसरोला दिली. त्यानंतर पिता-पुत्रांनी मिळून हत्या लपवण्यासाठी मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव केला. एका खासगी डॉक्टरकडून बनावट मृत्यू दाखला घेतला. शनिवारी संध्याकाळी आर्शिया यांचा धार्मिक विधीने गुपचूप दफनविधी पार पाडण्यात आला.

पण रविवारी घरकाम करणाऱ्या महिलेच्या लक्षात घरातील रक्ताचे डाग आल्याने तिने संशय व्यक्त केला. या प्रकरणाची माहिती थेट पालघर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या आदेशावरून गुन्हे शाखा-2 च्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत हा बनाव उघडकीस आणला. पोलिसांनी इम्रान आणि आमिर खुसरो या दोघांना गुन्ह्यातील सहभागासाठी अटक करण्यात आली.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india