हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. 14 जुलै रोजी हवामानाच्या (IMD) नुसार अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. जुलै महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता असतेच. हाच अंदाज लक्षात घेता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबाबत एकूण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.
हवमान विभागाने कोकणाविषयी काय सांगितलं?
हवामान विभागाने कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषकरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मान्सूनची स्थिती कायम आहे. तर काही ठिकाणी चक्री वारे वाहण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील मान्सून स्थिती?
मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मध्यम ते जोराचा पाऊस कोसळेल. पुण्यात काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असा हवामान विभागाने सल्ला दिला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील मान्सून स्थिती
मराठवाड्यात हलका ते मध्यम विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच ढगसदृश पावसाच्या स्थितीचा धोका नसणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी सतर्क रहावं, असा हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी गोंदिया आणि नागपूरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागात पावसाचा येलो किंवा रेड अलर्ट जारी केला आहे. अमरावती आणि चंद्रपूरमध्ये मध्यम स्वरुपाचामान्सून असेल.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








