best news portal development company in india

रेड अलर्ट, महाराष्ट्र ला धोक्याचा इशारा, आजचा हवामानाचा अंदाज

SHARE:

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे.(weather) गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. आजही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आज पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने आज रायगड आणि रत्निरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज कोकणामधील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. (weather)तसेच नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज रत्नागिरी जिल्ह्याला पावाचा रेड अलर्ट दिला आहे. तर २४ आणि २५ मे कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळीवाऱ्यासह पाऊस आणि ताशी ६० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेले तीन दिवस मान्सूनपूर्व पावसाने कोकणात धुमाकूळ घातला आहे.(weather)पुढच्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत खराब हवामानाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. नागरिकांनी सतर्क राहवे असा इशारा देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट असल्याने जोरदार पाऊस, वादळ सदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india