अपार कष्ट अन् जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुंग येथील वेंदात प्रवीण वाईंगडे. भारत सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘एनडीए’ प्रवेश परीक्षेत देशातून १६० व्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवीत तुंगचा व सांगली जिल्ह्याचा झेंडा त्याने देशात रोवला याचा निश्चितच अभिमान आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वेदांतची ही खडतर मेहनत इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








