मातोश्रीवर दोन मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचे असा आरोप डॉ. गोऱ्हे यांनी केले. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली/मुंबई: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप पक्षातील फुटीनंतरही सुरू आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर सनसनाटी आरोप केले. मातोश्रीवर दोन मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचे असा आरोप डॉ. गोऱ्हे यांनी केले. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिले आहे.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटले?दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात मुलाखतीत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विविध मुद्यांवर भाष्य करताना ठाकरे गटावर आरोप केले. गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदे यांना दिले होते. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. ठाकरेच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची असा आरोप डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. मातोश्रीवर पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपण शिवसेना सोडून गेलेल्यांवर बोलत नसल्याचे म्हटले. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपाबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, जाऊ द्या…मी त्याकडे लक्ष देत नाही.एक महिला म्हणून आदर आहे. त्यांनी राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हटले. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल. पण माझी जुनी माणसे, निष्ठावान माणसे माझ्यासोबत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
संजय राऊतांचाही पलटवार…
‘मातोश्री’वर संजय राऊत यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार केला. संजय राऊत यांनी म्हटले की, नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरे यांनी 4 वेळेस आमदार केले. त्यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी किती मर्सिडिज दिल्यात, असा सवाल राऊत यांनी केला. नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडिज खरेदी केल्याच्या पावत्या दाखवाव्यात असेही राऊत यांनी म्हटले.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








