best news portal development company in india

नाशिकच्या राहुड घाटात भीषण अपघात, 9 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळल्या, काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती

SHARE:

एकाचवेळी 9 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात घडला आहे. या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाशिक : नाशिकमधून एक अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड राहुड घाटात भीषण अपघात झाला आहे. एकाचवेळी 9 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात घडला आहे. या अपघातात २ ते ३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णावाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

मुंबई -आग्रा महामार्गांवर असलेल्या चांदवडच्या राहूड घाटात अपघाताची मालिका सुरूच दुपारी 3 वाहनाचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना आता याच घाटात तीन ते चार वाहने एकामेकांवर आदळली आहे. या अपघातात 2 ते ३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. तर अपघातात 7 ते 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ८ ते ९ वाहनांचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातामुळे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india