best news portal development company in india

मंत्रिमंडळातून डावललं, नाराज छगन भुजबळांचा भाजपात प्रवेश कधी? समोर आली मोठी अपडेट

SHARE:

भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. आता भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच दुखावले होते. नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. तर, दुसरीकडे भुजबळांच्या समर्थकांनी आंदोलन केले. भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. आता भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी थेट हिवाळी अधिवेशन सोडून नाशिक गाठले आणि समर्थकांच्या भेटगाठी घेतल्या. भुजबळांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात भुजबळांच्या काही समर्थकांनी भाजपात प्रवेश करण्याचे आवाहन केले. मात्र भुजबळांनी त्यावर अधिक भाष्य केले नाही.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी थेट हिवाळी अधिवेशन सोडून नाशिक गाठले आणि समर्थकांच्या भेटगाठी घेतल्या. भुजबळांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात भुजबळांच्या काही समर्थकांनी भाजपात प्रवेश करण्याचे आवाहन केले. मात्र भुजबळांनी त्यावर अधिक भाष्य केले नाही.छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीत ओबीसींच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याचे भुजबळांनी सांगितले. पण, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भुजबळांनी थेट भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे भुजबळ भाजपात कधी जाणार, याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले.

भाजप प्रवेश कधी?

सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास छगन भुजबळ यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही. भुजबळ हे मोठे नेते आहेत. मात्र, महायुतीत वाद नको म्हणून भुजबळ यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नसल्याचे वरिष्ठ नेत्याने न्यूज 18 लोकमतला सांगितले. भुजबळ यांना सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसला दुखावू इच्छित नाही. महायुतीत छगन भुजबळ यांचा सन्मान राखला जावा असं भाजपच्या बड्या नेत्याचं मत आहे.लवकरच भुजबळ यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या महायुतीतील नाराज असलेल्या नेत्यांसंदर्भात महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीत या नेत्यांसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे विश्वसनीय नेत्यांनी सांगितले.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india