द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जादेत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीलायश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका करमुक्तकरण्यास मान्यता देण्यात येणार आली असल्याची माहितीमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.-वस्तू व सेवा कर परिषदेची 55 वी बैठक दि. 21 – 22 डिसेंबर2024 रोजी जैसलमेर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आलीआहे.
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याअध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत देशभरातील सर्व राज्यांचेअर्थमंत्री, मंत्री सहभागी झाले आहेत. या परिषदेत महाराष्ट्रशासनाचे प्रतिनिधीत्व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे करतआहेत.हळद, गुळ याप्रमाणेच मनुके कृषी उत्पादन असल्याने त्यालावस्तू व सेवा करातून वगळण्याची शिफारस मंत्री आदितीतटकरे यांनी केली होती. त्यास परिषदेत मान्यता देण्यातआल्याने या आधी 5 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) असणारेमनुके आता करमुक्त झाले आहेत.
मनुका, बेदाणे, हळद, गुळ हे महाराष्ट्र मुल्यवर्धित करात(MVAT) करमुक्त होते. मनुका या अपवादाव्यतिरिक्त इतरसुकामेवा कराच्या कक्षेत येत होता. इतर कुठलीही प्रक्रिया नकरता केवळ द्राक्षे सुकवून मनुके तयार करण्यात येतात.त्यामुळे याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत सध्याच्या 5 टक्केकर कक्षेतून वगळण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर सकारात्मक निर्णय होउन शेतकऱ्यांकडून विक्री होणारे मनुके झाले आहेत.याबाबत बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,कुठलीही प्रक्रिया न करता इतर शेती उत्पादनाप्रमाणेच मनुका शेतकर्यांकडूनच तयार करण्यात येतो. त्यामुळे कृषी उत्पादनदर्जा देत करमुक्ती मिळाल्याचे समाधान आहे. आपल्या राज्यातील नाशिक, सांगली अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महिला बचत गट ही यात मोठ्या प्रमाणात त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.या परिषदेसाठी मार्गदर्शन करत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानते.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








