यामध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहे. तर १० नागरिक आहेत त्यांना मृतघोषित केलं आहे. जखमींना नौदलाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे’
नागपूर: मुंबईच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटेनं नीलकमल बोटीला धडक दिली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहे. तर १०१ लोकांना सुखरूप बचावले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात दिली. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड धडकली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात माहिती दिली.
“मुंबईजवळील बुचर आयलंड जवळ ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाच्या फेरीबोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिली. मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १०१ लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. नौदलाचे अधिकारी संदीप जगजीतसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ६.३० पर्यंत १३ जणांना मृत घोषित केलं आहे. यामध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहे. तर १० नागरिक आहेत त्यांना मृतघोषित केलं आहे. जखमींना नौदलाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे’ असं फडणवीस यांनी सांगितलं
“नौदल आणि कोस्टगार्डने तातडीने बचावकार्य केलं आहे. यामध्ये ९ बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली. आणखी बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. गुरुवारी याची अधिकृत माहिती दिली जाईल. या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल’ अशी सूचनाही फडणवीस यांनी दिली.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








