best news portal development company in india

श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधींमध्ये संसदेत खडाजंगी, नेमकं काय घडलं?

SHARE:

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने संसदेत विशेष चर्चासत्र भरवण्यात आले होते.

या दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाली.

तुमची आजी संविधान विरोधी होती का?; श्रीकांत शिंदे यांचा थेट राहुल गांधी यांना सवालसंविधानाचं आर्टिकल 45मध्ये 10 वर्षाच्या आत देशातील 14 वर्षाखालील मुलांना शिक्षणाचा अधिकार द्यावा असं म्हटलं होतं. पण हा अधिकार मिळाला नाही. त्यासाठी 50 वर्ष लागले. पण आमच्या सरकारने हा अधिकार दिला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. पण काँग्रेसला अंगठेबहाद्दर लोक हवे होते. म्हणूनच ते शिक्षणाचा अधिकार देऊ शकले नाही, असा हल्लाच श्रीकांत शिंदे यांनी चढवला.

संविधानाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही संविधानावरील चर्चेला आला आहात. चर्चा करत आहात. पण संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा साधा उल्लेखही तुमच्या भाषणात आला नाही, असा घणाघाती हल्लाच श्रीकांत शिंदे यांनी चढवला. तर पुढच्याच मिनिटाला तुमच्या आजी इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का? असा खरमरीत सवालच श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना विचारला.

संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संसदेत संविधानावर चर्चा होत आहे. या चर्चेत भाग घेताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा सवाल केला आहे. मी राहुल गांधी यांचं भाषण ऐकलं. राहुल गांधी यांनी संविधान सोडून सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला. गेल्यावेळी अभय मुद्रावर बोलत होते. आताही त्यावरच बोलले. त्याच्या बाहेर आले नाही. अभय मुद्रा अहिंसा शिकवते, असा चिमटा श्रीकांत शिंदे यांनी काढला. श्रीलंकेने तीनदा संविधान बदललं, पाकिस्तान सहा वेळा, नेपाळने पाच वेळा, पण आपलं संविधान मजबूत आहे. संविधानाची चर्चा बाबासाहेब आणि गांधींशिवाय होत नाही. पण काँग्रेस नेत्यांनी संविधानाची चर्चा करताना बाबासाहेबांचं नावही घेतलं नाही. बाबासाहेबांचा विरोध त्यांचा कायम आहे. बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा पराभूत केलं होतं, असा हल्लाच त्यांनी चढवला

एकही दंगल झाली नाही1984 मध्ये शिखांविरोधात नॉन स्टॉप हिंसा करण्याचं काम यांनी केलं. हे विसरू नका. तरुणांचे अंगठे कापत होते. 1964मध्ये 1 हजार 70 जातीय दंगली काँग्रेसच्याच काळात झाल्या. कारसेवकांवर यांनी गोळ्या चालवल्या. 1993 मधला बॉम्बस्फोट यांच्या काळात झाला. गेल्या 10 वर्षात देशात एकही बॉम्ब स्फोट झाला नाही, याकडेही श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india