best news portal development company in india

मिरज मध्ये भाजप नेते सुधाकर खाडे यांचा निर्घृण खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात… सर्वत्र खळबळ..

SHARE:

मिरज प्रतिनिधी – मनसेचे माजी-जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या वादातून मानेवर कुऱ्हाडीने घावघालत निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांवर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.सुधाकर खाडे यांनी मिरजेत पंढरपूर रस्त्यावर राममंदिरालगत चंदनवाले मळा येथील पावणेचार एकर जमीन सचिन जगदाळे यांच्याकडून विकसनासाठी घेतली होती. मात्र यास लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतल्याने गेले काही महिने खाडे यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. या जागेवर कुंपण घालण्यासाठी सुधाकर खाडे, आप्पा ओतारी, ओंकार पवार यांच्यासह आठ ते दहा साथीदारांसोबत गेले होते.यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक चंदनवाले कुटुंबीय वसुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली.

यावेळी रागातून कार्तिक चंदनवाले याने कुऱ्हाडीने अचानकमागून सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. कुऱ्हाडीचामानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला.यावेळी खाडे यांच्या साथीदारांवर हल्ला चढविल्याने तेथेमोठा गोंधळ उडाला होता. खाडे यांना मिरजेत खासगीरुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.खुनानंतर कार्तिक चंदनवाले या आरोपीस पोलिसांनी अटक केली. दरम्यान सुधाकर खाडे यांच्या खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खाडे यांच्या खुनाच्या घटनेचे मोबाईलवर चित्रण झाले आहे. याप्रकरणी गांधी चौकपोलिसात कार्तिक चंदनवाले, लक्ष्मण चंदनवाले, शंकरचंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह तीन महिला विरुद्धखुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india