best news portal development company in india

भाजपची दुसरी यादी जाहीर, अनेक मोठे बदल, 22 जणांची संपूर्ण नावं!

SHARE:

एकूण २२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे. आधी 99 जणांची यादी जाहीर केली आहे. आता एकूण 121 उमेदवार जाहीर झाले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला आहे. त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण २२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे. आधी 99 जणांची यादी जाहीर केली आहे. आता एकूण 121 उमेदवार जाहीर झाले आहे. या दुसऱ्या यादीत गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली आहे. तर नाशिकमधूनदेवयानी फरांदे यांना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

धुळे ग्रामीण – राम भदाणेमलकापूर – चैनसुख मदनलाल संचेतीअकोट – प्रकाश भारसाकलेअकोला पश्चिम – विजय अग्रवालवाशिम (अजा) – श्याम रामचरणजी खोडेमेळघाट – केवलराव काळेगडचिरोली – मिलिंद नरोटेराजुरा – देवराव भोंगलेब्रहमपुरी – कृष्णलाल बाजीराव सहारेवरोरा – करण देवतलेनाशिक मध्य – देवयानी फरांदेविक्रमगढ – हरिश्चंद्र भोयेउल्हासनगर – कुमार उत्तमचंद आयलानीपेन – रवींद्र दगडू पाटीलखडकवासला – भिमराव तापकीरपुणे (छावणी)- सुनील कांबळेकसबा पेठ – हेमंत रासणेलातूर ग्रामीण – रमेश कराडसोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठेपंढरपूर – समाधान आवताडेशिराळ – सत्यजित शिवाजीराव देशमुखजत – गोपीचंद पडळकर

विशेष म्हणजे, पुण्यात भाजपकडून सर्व आमदार पुन्हा आहे तसेच रिपीट करण्यात आले आहे. कँन्टोमेंटमधून पुन्हा सुनील कांबळे यांनाच उमेदवारी दिली आहे. तर खडकवासला मधूनही भीमराव तापकीर यांनाच पुन्हा संधी दिली आहे. कसब्यातूनही पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या हेमंत रासने यांनाच पुन्हा तिकीट दिलं आहे. पुण्यातून भाजपने यावेळी एकही नवा चेहरा दिला नाही

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india