best news portal development company in india

लिंगायत सन्मान यात्रा धर्मासाठी की भाजपासाठी ?■ लिंगायत समाजबांधवांचा सवाल : सरकारकडून समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष

SHARE:

लिंगायत सन्मान यात्रा धर्मासाठी की भाजपासाठी ?
■ लिंगायत समाजबांधवांचा सवाल : सरकारकडून समाजाच्या मागण्याकडे  दुर्लक्ष.
लिंगायत समाजात एकसंघता
निर्माण करण्यासाठी भाजपाचे
राज्यसभेचे खासदार डॉ. अजित
गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली विरशैव
मान्यता व
लिंगायत सन्मान यात्रा सध्या सुरू
आहे. या यात्रेत लिंगायत धर्माला
संविधानिक अल्पसंख्याक दर्जा आदीसह विविध
मागण्यांना जाणीवपूर्वक बगल देण्यात
आली आहे. साधी चर्चा देखील या
सन्मान यात्रेत केली नाही. त्यामुळे
लिंगायत धर्म बांधवात नाराजी निर्माण
झाली आहे. सन्मान यात्रा लिंगायत
धर्मासाठी होती कि भाजपासाठी ?
असा सवाल विचारला जात आहे.
भाजपाचे खा. डॉ. अजित
गोपछडे यांनी विरशैव लिंगायत
सन्मान यात्रा काढली. शुक्रवारी
सांगली जिल्ह्यातील
कवठेमहांकाळ व मिरज येथे तसेच
जत,लिंगायत धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जावर चर्चा नाही.सध्या केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे लिंगायत धर्माला न्याय मिळणार अशी लिंगायत बांधवांची अपेक्षा होती. शिवाय सन्मान
झालेली नाही. शिवाय महात्मा
बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ,
मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर
स्मारक केंद्र, मुंबई येथील महात्मा
सुमारे ३० ते ३५ मोर्चे काढण्यात
आले होते. तसेच दिल्ली येथे राष्ट्रीय
आंदोलन व मुंबई येथे भव्य मोर्चा
काढुन लिंगायत बांधवांनी स्वतंत्र धर्म
यात्रेचे प्रमुख खासदार डॉ. अजित गोपछडे हे भाजपाचे नेते आहेत. त्यामुळे बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा मान्यता व अल्पसंख्याक दर्जा
या सन्मान यात्रेत सर्व मागण्यांचा विचार केला जाईल असे वाटत होते मात्र
लिंगायत सन्मान यात्रेवेळी लिंगायत धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा या
प्रमुख मागणीवर कोणत्याही प्रकारे कसलीही चर्चा झाली नाही. ही खरी
शोकांतिका आहे. या यात्रेत धर्म मान्यता व दर्जा यावर चर्चा न झालेने सर्वत्र
नाराजी निर्माण झाली आहे. सन्मान यात्रा ही लिंगायत धर्म बांधवासाठी आहे
कि भाजपाच्या प्रचारासाठी आहे? असा सवाल विचारला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काढण्यात
आली. यावेळी लिंगायत नेते डॉ.
रविंद्र आरळी, राजशेखर तंबाखे,
गजेंद्र कुल्लोळी, बाबासाहेब
आळतेकर, मिलिंद साखरपे,
महांकाली
सहकारी
साखर
कारखान्याच्या चेअरमन अनिता
सगरे, प्रदीप वाले, तुकाराम माळी
आदी सहभागी झाले.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात
सन्मान यात्रेच्या बैठकीत किंवा
सत्कार तसेच स्वागतावेळी लिंगायत
धर्म बांधवाची अतिशय महत्त्वाची व
जिव्हाळ्याची असलेली व गेल्या दहा
वर्षात केंद्र व राज्य सरकारने दुर्लक्षित
केलेली व जाणीवपूर्वक प्रलंबित
असलेली लिंगायत धर्माला स्वतंत्र
संविधानिक मानता व अल्पसंख्याक
दर्जा या मागणीवर साधी चर्चाही
आदीसह कोणत्याच मागणी चर्चा
झाली नाही. यावरून राज्यातील
लिंगायत धर्म बांधवात संभ्रमावस्था
निर्माण झाली आहे.
महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या
शतकात स्थापन केलेल्या प्राचीन व
स्वतंत्र असलेल्या लिंगायत धर्माला
स्वतंत्र संविधानिक मानता व
अल्पसंख्याक दर्जा मिळावा ही
प्रमुख मागणी देशातील लिंगायत धर्म
बांधवाची आहे. सन २०१४ मध्ये
कराड येथे लिंगायत धर्म बांधवाच्या
वतीने धर्म मान्यता व अल्पसंख्याक
दर्जा या प्रमुख मागणीसाठी आमरण
उपोषण करण्यात आले होते.
लिंगायत धर्म मान्यतेसाठी महाराष्ट्रात
मिळावा याकरीता संपूर्ण देशातील
लिंगायत समाज एकवटला
होता. परंतु लिंगायत धर्माला न्याय
मिळाला नाही.
गेली दहा वर्षे देशातील लिंगायत
धर्म बांधव धर्म मान्यता व
अल्पसंख्याक दर्जा सह महात्मा
बसवेश्वर स्मारक, मुंबई येथे महात्मा
बसवेश्वर अश्वारूढ पुतळा, महात्मा
बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
आदीसह विविध मागण्यासाठी
राज्यातील लिंगायत समाज
एकवटला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार
लिंगायत धर्म बांधवाच्या मागणीकडे
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india