best news portal development company in india

अखेर सांगली बसस्थानकाचे काँक्रिटीकरण सुरू

SHARE:

अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येथील मुख्य बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी तीन महिने लागणार असून, यासाठी सुमारे तीन कोटी रुपये औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सात बस स्थानकांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सांगलीच्या बसस्थानक परिसराची दुरवस्था झाली होती. बस लावण्याच्या परिसरात मोठे खड्डे पडले होते. याबाबत बस प्रशासनाकडून अनेकवेळा प्रस्ताव पाठवूनही रस्ता आणि परिसराचे डांबरीकरणासाठी निधी मिळाला नव्हता. त्यामुळे सुमारे दहा वर्षांहून अधिक काळापासून बसस्थानक परिसराची दुरवस्था झाली होती. डांबरीकरण उखडल्याने दगड, खडी बाहेर आली होती. स्थानक परिसरातील रस्ते खराब झाल्याने अपघात वाढले होते.

आता औद्योगिक विकास महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपये मंजूर केल्यानंतर चार दिवसांपासून परिसराचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम बाजूच्या बसस्थानक मैदानाचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी सुमारे दीड फूट खड्डा खणण्यात आला आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्मपर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सात बसस्थानकांचे काँक्रिटीकरणसांगलीबरोबर जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, विटा, इस्लामपूर आणि शिराळा बसस्थानकाच्या संपूर्ण परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे 25 वर्षापर्यंत बसस्थानक सुस्थितीत राहणार आहे, अशी माहिती एसटीचे अभियंते सुशांत पाटील यांनी दिली.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india